१९५०-७० च्या सुमारास हिंदी चित्रपट आणि संगीत यांचे लोकांना वेड होते. त्या काळी चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहणे ही एक प्रकारची चैन होती आणि गाणी रेडिओवर ऐकणे हा नाद होता. त्या प्रवाहात वाहात गेल्यामुळे त्या संगीताचा प्रभाव पडला आणि हे पुस्तक निर्माण झाले. तेव्हाचे सगळे संगीतकार एस डी बर्मन, रोशन, नौशाद, शंकर जयकिशन अशा ३० पेक्षा जास्त संगीतकारांचा "माझे आवडते संगीतकार" या पुस्तकात समावेश आहे.