Share this book with your friends

Sahaj Suchala Mhanun / सहज सुचलं म्हणून

Author Name: Jayant Anant Deshpande | Format: Paperback | Genre : Letters & Essays | Other Details

स्टेट बँकेसारख्या सेवा उद्योगात चाळीस वर्षे काम केल्याने जनसंपर्क खूप प्राप्त झाला. चांगलं लिखाण वाचायची सवय लहानपणापासून होती. पण काही लिहावे यासाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये वेळ मिळू शकला नाही. लिहिण्याची आवड सेवानिवृत्तीनंतर जोपासू शकलो. समाजात वावरताना व्यक्ती, वृत्ती, प्रवृत्ती, स्वभावातील गुणदोष जवळून अनुभवायला मिळाले. वयाची साठ वर्ष पार केल्यामुळे नाती, आपसी संबंध, वागण्या बोलण्यातील गुणदोष अशा चांगल्या वाईट गोष्टींचे अनुभव गाठीशी होतेच. ह्या सर्व गोष्टींना शब्दरूप द्यावे अशी प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. त्यानुसार काही ललित लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. समाज माध्यमांमध्ये लेखांना बरीच लोकप्रियता मिळत गेली. "सहज सुचलं म्हणून" लेख संग्रहातील ललित लेख हे वेगवेगळ्या विषयावर आहेत, काही पौराणिक मान्यतेवर आधारित आहेत आणि मोजक्या कथा पण समाविष्ट केल्या आहेत. वाचकांना काही लेख गंभीर करतील, काही लेख माहितीपूर्ण आढळतील. थोडक्यात एकाच पुस्तकात वाचकांना विविधांगी विषय वाचावयास मिळतील अशी अपेक्षा आहे. आपण त्याचा आनंदाने स्वीकार कराल याची कुठेतरी निश्चित खात्री वाटते. धन्यवाद.

Read More...
Paperback
Paperback 449

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

जयंत अनंत देशपांडे

श्री जयंत अनंत देशपांडे ह्यांचा "सहज सुचलं म्हणून" ललित लेख संग्रह बऱ्याच दृष्टीने आगळा वेगळा आहे. त्यात एकूण चाळीस लेख आहेत. लेख वाचताना लेखकाची निरीक्षण शक्ती, स्वभाव विश्लेषणाची क्षमता, ओघवती भाषा आणि मानवी मनाचे जवळून अवलोकन दृष्टिगोचर होते. लेखकाने आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना अलौकिक शब्दरूप दिल्याचे जाणवते.

लेखक स्वतः गेल्या दहा वर्षापासून ज्येष्ठ नागरिक मंडळ चालवीत असल्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या, गरजा जवळून जाणतात. त्यावर त्यांनी एक प्रदीर्घ लेख ह्या लेखसंग्रहात समाविष्ट केला आहे. संगीत हा त्याचा आवडता विषय असल्याने संगीताचे रसग्रहण सुद्धा वाचकांना अनुभवावयास मिळेल. संग्रहात तीन लघुकथा सुद्धा अंतर्भूत आहेत. एकंदरीत लेखसंग्रह वाचकांना आनंद देईल हे निश्चित. कुठल्याही अंगाने लेखसंग्रह पहिला असेल असे वाटत नाही. विविध विषयासोबत मानवी मनाला स्पर्श करणारे लिखाण वाचकांना नक्कीच आवडेल.

Read More...

Achievements