Share this book with your friends

Dushtachakra / दुष्टचक्र

Author Name: Kavita Datar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

दुष्टचक्र हा चित्तथरारक भयकथांचा संग्रह वाचकांसाठी सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. यातील प्रत्येक कथा एक प्रकारचा संदेश वाचकाला देते.

दुष्टचक्र या कथेत व्यक्तीच्या वाईट कर्मांचे फळ त्याच्या आप्तस्वकियांना कसे भोगावे लागते, हे मांडले आहे.

व्यक्तीच्या अंतर्मनातील अपराधी भावनांची आंदोलनं, त्यामुळे तिला होणारे आभास, याचे चित्रण आभास या कथेत आहे.

अन्याय आणि अत्याचाराला बळी पडलेल्या अतृप्त स्त्रीची व्यथा ती कोण होती??? या कथेत अधोरेखित आहे.

खरं प्रेम हे जात, धर्माच्या पलीकडील भावनांचा एक सुंदर आविष्कार असतो, हे आपल्याला कालचक्र ही कथा सांगून जाते.

वचन ही कथा कर्तव्याची जाणीव करून देते.

माणसाने कुठल्याही गोष्टीचा अती लोभ करू नाही, हे गुप्तधन ही कथा वाचकांना सांगते.

प्रतिशोध ही कथा नायिकेचे थोरल्या बहिणी वरील प्रेम अधोरेखित करते.

आत्मदाह आणि मला भूत भेटले या कथा कळत नकळत एक मोलाचा संदेश देऊन जातात.

आशा करते की या संग्रहातील कथा वाचकांना नक्कीच आवडतील.

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Ratings & Reviews

0 out of 5 (0 ratings) | Write a review
Write your review for this book

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

कविता दातार

महाराष्ट्रातील कविता दातार या संगणकात मास्टर आहेत. त्या कॉर्पोरेट ट्रेनर, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट, लेखिका आणि ब्लॉगर आहेत. त्या वेगवेगळ्या शैलीत ब्लॉग आणि कथा लिहितात.

Read More...

Achievements

+4 more
View All