Share this book with your friends

Nirmala / निर्मला Ek Sangharsh

Author Name: Shinde Murlidhar S. | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details


जेव्हा निती एखाद्या व्यक्तीची परीक्षा घेते, तेव्हा ती केवळ संकटं धाडत नाही, तर त्या व्यक्तीच्या सहनशक्तीचा अक्षरशः अंत पाहते. ‘निर्मला’ या पुस्तकाची कथा ही केवळ एका मुलीची कहाणी नसून, ती मानवी इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या सर्वोच्च शिखराची गाथा आहे.

डोंबारी समाजातील एका लहान मुलीचे बालपण रस्त्यावरच्या खेळांमध्ये आणि गरिबीच्या गडद सावटात गेले. पोटाची खळगी भरण्यासाठी खेळ दाखवताना अचानक पाय मोडला आणि तिचे आयुष्य रुग्णालयाच्या चार भिंतींत अडकले. शारीरिक वेदना असह्य होत्याच, पण त्याच काळात सावकाराच्या अमानुष त्रासाला कंटाळून तिच्या माऊलीने केलेली आत्महत्या हा निर्मलाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात ठरला. 

 मोडलेला पाय आणि उद्ध्वस्त झालेलं कुटुंब तिला रोखू शकलं नाही. जिद्दीने शाळेत प्रवेश मिळवला आणि आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत तिने थेट जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. उच्च शिक्षणासाठी घराबाहेर पडून वसतिगृहातील अत्यंत संघर्षमय जीवन तिने स्वीकारले. तिथली प्रत्येक रात्र तिने केवळ आपल्या डोळ्यांतील स्वप्नांच्या जोरावर काढली.

या पुस्तकात निर्मलाचा तो थक्क करणारा प्रवास आहे, जिथे ती आयुष्यातील प्रत्येक संकटाचे उत्तर आपल्या अभ्यासातून देते. .दिवस-रात्र एक करून ती पोलीस अधीक्षक (SP) पदापर्यंत कशी पोहोचली आणि तिने स्वतःच्या अधिकारात प्रत्येक अन्यायाचा हिशोब कसा चुकता केला, याचा हा अंगावर शहारे आणणारा प्रवास आहे.

हे पुस्तक प्रत्येक त्या मुलीसाठी आहे जी संकटात सापडली आहे आणि प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जिने परिस्थितीसमोर गुडघे टेकले आहेत. निर्मलाची ही जिद्द तुम्हाला ठामपणे सांगते की, "तुमची परिस्थिती तुमचे भविष्य ठरवू शकत नाही, तुमचे प्रामाणिक प्रयत्नच तुमचे नशीब घडवतात."

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

शिंदे मुरलीधर एस.

मुरलीधर शिंदे हे मागील पंधरा वर्षांपासून सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा वि‌द्यापीठ, नांदेड येथून बायोटेक्नॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते लाइफ सायन्स या विषयात नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत तसेच त्यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथेही संशोधन कार्य केले आहे. यापूर्वी त्यांनी 'मारवी' नावाची वाचकप्रिय कादंबरी लिहिली आहे. ते सतत संशोधन कार्यात मग्न असतात.

Read More...

Achievements

+2 more
View All