डॉ. विनय भोळे
डॉ. विनय भोळे गेली एकतीस वर्षे कॉमर्स अँड मॅनेजमेंट विषयांचे प्राध्यापक असून मॉडेल कॉलेज, डोंबिवली येथे प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यांनी आजवर कॉमर्स, अकाउंट्स, लॉ, सायकॉलॉजी, मॅनेजमेंट, क्रिमिनॉलॉजी, इकॉनॉमिक्स अशा अनेक विषयांत सुमारे पंचवीस पदव्या आणि पदविका संपादन केल्या आहेत. लहानपणापासून आजवर अव्याहतपणे त्यांनी स्वतःचे शिक्षण सुरु ठेवले आहे.
त्यांचे पन्नास पेक्षा जास्त शोधनिबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल्स मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
मुंबई विद्यापीठात ते पी. एच. डी. गाईड आहेत. नॅक (नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन कौंसिल), बंगलोर येथे नॅक असेसर या पदावर कार्यरत असून तसेच युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट कमिशनच्या विद्यापीठ पीअर टीमवर त्यांची दोनदा नियुक्ती झाली आहे. ऑटोनॉमी म्हणजेच स्वायत्तता मिळवण्याच्या प्रक्रियेत त्यांनी आजवर अनेक कॉलेजेसला मार्गदर्शन केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ अशा वृत्तपत्रांतून तसेच विविध मासिकांतून त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलं आहे.
आजवर अनेक सामाजिक संस्थांमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे.
डॉ. विनय भोळे यांना आजवर महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सचा संशोधन विषयक पुरस्कार, विद्यार्थी सहायक संस्था, गिरगांव यांचा 'विद्याभूषण पुरस्कार', डोंबिवलीकर प्रतिष्ठानचा 'आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार', दिल्ली येथील सामाजिक संस्थेमार्फत 'आर्च ऑफ एक्सलन्स पुरस्कार', इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग तर्फे 'विद्या विभूषण पुरस्कार, नागरी सत्कार समिती, डोंबिवलीतर्फे 'चैतन्य पुरस्कार', कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे 'कोंकण शिक्षण रत्न पुरस्कार', वालिया सेंटर फॉर एक्सल्न्स, मुंबई, तर्फे एक्सेपशनल टीचर अवॉर्ड, परशुराम सेवा संघ, पुणे तर्फे 'शिक्षणरत्न पुरस्कार', रोटरी तर्फे 'इन्स्पिरेशनल डायरेक्टर अवॉर्ड' प्रदान करण्यात आले आहेत.
पोलीस खात्याच्या विविध सामाजिक समित्यांवर त्यांनी गेली तेवीस वर्षे काम केलं आहे. डोंबिवली जिमखाना, जनरल एजुकेशन सोसायटी, दादर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट, नागरी सत्कार न्यास अशा अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. ब्राह्मण सभा, डोंबिवली या डोंबिवलीतील सर्वात जुन्या सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. ते ज्योतिष, वास्तुशास्त्र विषयांचे अभ्यासक आहेत.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या भूमिका स्पष्टपणे मांडणारं त्यांचं 'पालकनीती' नावाचं पुस्तक नुकतंच मोरया प्रकाशन, यांनी प्रकाशित केलं आहे.
नुकतंच त्यांचं 'व्यवस्थापन: कालचं आणि आजचं' हे प्राचीन भारतीय कथा आणि त्यातील आधुनिक व्यवस्थापन या विषयावरचं पुस्तक क्रिएटिव पेन्स तर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची प्रस्तावना तर दुबईतील सुप्रसिध्द व्यापारी मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांचं आशीर्वचन लाभलं आहे.