हे पुस्तक ‘अंतिम पग : अंतः अस्ति प्रारंभ :’ संरक्षण करिअर मार्गदर्शक पुस्तक आहे.
ज्यांना या महान राष्ट्रासाठी आपले योगदान द्यायचे आहे, परंतु माहितीच्या अभावामुळे क्षमता असूनही ते करू शकत नाहीत, अशा इच्छुकांच्या मनात जिद्द प्रज्वलित करणे हा या पुस्तकाचा एकमेव उद्देश आहे.त्यांना जागरूक करून विविध स्पर्धात्मक संरक्षण सेवा परीक्षा देण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.
तरुण मुला-मुलींच्या मनामध्ये सैन्यदलात अधिकारी बनण्याची प्रेरणा जागृत करून,स्पर्धात्मक संरक्षण सेवा परीक्षेसंबंधीची सर्व माहिती त्यांना एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे पुस्तक त्यांच्या सैन्यदलातील करिअरच्या मार्गावर एखाद्या दीपस्तंभासारखे काम करीत आहे.
हे पुस्तक तुम्हाला संरक्षण सेवेत (सैन्य/नौदल/वायुसेना/भारतीय तटरक्षक) अधिकारी म्हणून प्रवेश करण्याच्या प्रत्येक संभाव्य संधीची माहिती करून देईल.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य जे त्याला एकमेव बनविते ते म्हणजे इयत्ता सातवी आणि दहावी पासूनच RIMC, डेहराडून आणि SPI, औरंगाबाद (संभाजीनगर)सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश कसा मिळवायचा, त्या साठी काय तयारी करावयास हवी याची इत्यंभूत माहिती देते. या संस्था त्यांनी देशाला बहाल केलेल्या सहा जनरल आणि भारतीय सैन्यदलातील सर्वोच्च अधिकारी याबाबतच्या त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध आहेत.
तुम्ही कशाचा विचार करत आहात?तुमची स्वप्ने काय आहेत?तुम्हाला या करिअरकडून काय अपेक्षा आहेत? एक गणवेश, असाधारण सहकारी,बंदूक किंवा तुम्हाला जे काही व्हायचे आहे ते बनण्याची संधी?सैन्यदल ही अशी एकमेव संस्था आहे ज्या मध्ये सहभागी झाल्यास ती तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करू देते.लष्कर तुम्हाला एक उत्तम व्यक्ती,एक नेता आणि निर्णय घेणारा बनवते.तुम्ही निवृत्त झाल्यानंतरही दुसर्या करिअरमध्ये काम करण्यासाठी तयार करते.जर तुम्ही संरक्षण दलात करिअर करण्याचा विचार करीत असाल तर या नंतर दुसरा कोणताच विचार करण्याची गरज नाही. हे भारतातील सर्वात रोमांचक कार्यस्थळ आहे,जिथे जग म्हणजेच तुमचे कार्यालय असेल.