आंध्र प्रदेशातील पवित्र कर्दळीवन जिथे दत्त अवतार नृसिंह सरस्वती ह्यांनी समाधी घेतली होती. ही कथा त्या समृद्ध अशा निसर्ग संपदेची आहे. जिथे जाण्यासाठी नुसती इच्छा असून चालत नाही.
जय, ३२ वर्षांचा युवक, ३० यात्रेकरूंना घेऊन तीन दिवसांच्या प्रवासासाठी निघाला असतो. त्यात १२ जण परत फिरतात माघारी परिक्रमा पूर्ण न करता. राहिलेले १८ जण तीन दिवसांची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी थांबतात. तिथे त्यांना भेटतात प्रचंड उत्साही आणि सदबहार 69 वर्षाचे व्यक्तिमत्व "काका", त्यांची तंबूत राहण्याची व्यवस्था काका करतात.
दुसर्या दिवशी प्रवास दरम्यान, निसर्गाचे कठोर रूप, अलौकिक घटनांचा अनुभव, आणि १४ वर्षीय आकाशच्या अचानक गायब होण्याने सगळ्यांची परीक्षा सुरू होते.
ही कथा आहे श्रद्धा, भय, आणि दिव्य शक्तींमधील संघर्षाची – जिथे प्रकाश आणि अंधार यांच्यातील सीमारेषा मिटतात, आणि मानवी नात्यांना नव्याने अर्थ मिळतो. जिथे विश्वास, कष्ट आणि अध्यात्म ह्यांची सांगड होते आणि आयुष्य ३६० अंशात बदलते. ही कथा आहे लहान मुलाची, त्याच्या आईची, दोन जावांची, तीन भावांची आणि एका तरुण ब्लॉगरची आणि समृद्ध अशा निसर्गाची आणि झाडांची.
अशा करतो ही कथा सर्वांना नक्की आवडेल. ही कथा काल्पनिक आहे.
कौशिक श्रोत्री