Share this book with your friends

Raddital Prem / रद्दीतल प्रेम

Author Name: Milind Chandrakant Gujar | Format: Hardcover | Genre : Literature & Fiction | Other Details

"एक विद्रोही कवी, एक अधुरं प्रेम आणि रद्दीच्या कागदांवर कोरलेलं सत्य!"

कॉलेजच्या कट्ट्यावर ज्याच्या शब्दांनी क्रांतीचे वारे वाहायचे, तो 'विद्रोही' कवी अचानक १५ वर्षांपूर्वी गायब होतो. मागे उरते ती फक्त त्याच्या निळ्या शाईने माखलेल्या हातांची आठवण आणि रियाच्या डोळ्यांतली प्रतीक्षा. १५ वर्षांनंतर रियाच्या हातात रद्दीतलं एक जुनं पुस्तक लागतं— 'पाणावले​​​​​​​ली पापणी'.

हे केवळ पुस्तक नव्हतं, तर तो त्या विद्रोही कवीच्या रक्ताने आणि घामाने लिहिलेला इतिहास होता. ज्या हातांनी भविष्याचं स्वप्न लिहिलं होतं, त्याच हातांना परिस्थितीने रद्दीची जड पोती उचलायला भाग पाडलं.

मिलिंद नक्की कुठे गेला?
त्याचं नाव 'वेटिंग लिस्ट' मध्ये असूनही तो अधिकारी का झाला नाही?
आणि या रद्दीतल्या पुस्तकात त्याने रियासाठी कोणता निरोप सोडलाय?
एका सामान्य तरुणाचा असामान्य संघर्ष आणि एका विद्रोही प्रेमाची चटका लावणारी कथा म्हणजे— रद्दीतल प्रेम.

Read More...
Hardcover

Ratings & Reviews

5 out of 5 (2 ratings) | Write a review
aartisweetypie.bobde58

Delete your review

Your review will be permanently removed from this book.
★★★★★
Nice
MG Creation's

Delete your review

Your review will be permanently removed from this book.
★★★★★

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

मिलिंद चंद्रकांत गुजर

मिलिंद चंद्रकांत गुजर हे कांदिवली, मुंबई येथील रहिवासी असून ते एक संवेदनशील लेखक आणि कवी आहेत. ते 'एम.जी. क्रिएशन्स' (MG Creations) या व्यवसायाचे मालक आहेत. 'पानावलेली पापणी' आणि 'आयुष्याचा प्रवास आणि काही कविता' यांसारख्या प्रसिद्ध ई-बुक्सच्या माध्यमातून त्यांनी वाचकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. साध्या शब्दांतून मानवी भावनांचे आणि संघर्षाचे पदर उलगडणे ही त्यांच्या लेखनाची खासियत असून, 'रद्दीतलं प्रेम' ही त्यांची एक हृदयद्रावक कलाकृती आहे.

Read More...

Achievements