Share this book with your friends

Amche Sah (la) Jeevan / आमचे सह(ल)जीवन

Author Name: Shrinivas Ranade | Format: Hardcover | Genre : Travel | Other Details

स्वतःच्या घरातून बाहेर पाऊल टाकून भोवतालचे  जग बघण्याची काडीमात्र इच्छा नसणारा आता साठ वर्षाचा झालेला “मुलगा” आणि कायम शहराबाहेर , देशाबाहेर जगभर हुंदडू पाहणारी आता साठीत शिरलेली “मुलगी” ह्यांचे  प्रेमबीम जुळवून  देवाने  पस्तीस वर्षांपूर्वी  मोठा जोकच मारला!!! त्याकाळी “लिव्ह इन” ची सोय नसल्याने ह्यांनी पाचशे लोकांसमोर लग्न  केले आणि  आदळआपट करत, धडपडत पण तरीही एकमेकांशी जुळवत यांचे हे सहल जीवन सुरु झाले.  ह्यात जागांच्या वर्णनापेक्षा तिथे पोहोचण्याच्याच खटाटोपी अधिक आहेत, टूरिस्टी फोटोंपेक्षा ते काढतानाच्या गमतीजमती आहेत, अज्ञात स्थळांच्या वर्णनांपेक्षा अपरिचितांशी मारलेल्या गप्पा आहेत, पूर्वी केलेल्या प्रवासातील साम्यस्थळे शोधण्याबरोबर एकमेकांचे स्वभावपरत्वे असणारे मतभेद आहेत. गिरगावातील मराठमोळ्या मुलाचे कॉन्व्हेंट शिक्षित बांद्रामधील मुली बरोबर झालेल्या प्रवास नामक जीवनाचे (!) किंवा जीवन नामक प्रवासाचे (!) हे वर्णन आहे.

 

Read More...
Hardcover
Hardcover 385

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

श्रीनिवास रानडे

श्रीनिवास रानडे ह्यांनी आपल्या करियर ची सुरवात फॅमिली फिजिशियन म्हणून केली. इंडस्ट्रियल हेल्थ ह्या विषयात प्राविण्य  मिळवल्यानंतर  महिंद्र आणि महिंद्र  कंपनीचे  मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ह्या भूमिकेत अकरा वर्षे ते काम करत होते. कोविद साथीच्या दरम्यान भारत भर पसरलेल्या कंपनीच्या साऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याची यशस्वी रित्या काळजी घेण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते . निवृत्तीनंतरही कंपनीचे जेष्ठ वैद्यकीय सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. श्रीनिवास रानडे ह्यांनी वैद्यकीय आणि इतरही विविध विषयांवरती मिश्किल रीतीने लिखाण केलेले असून ह्या प्रवास वर्णनात स्वतःच्या पत्नीस पॅकी ही पदवी बहाल करून ते नर्म विनोदी पद्धतीने साऱ्या सहलीत घडलेल्या गमती जमती आपल्याला कथन करतात.

Read More...

Achievements

+1 more
View All