Share this book with your friends

Zombie Pralay: Ek Adnyat Rahasya / झोंबी प्रलय : एक अज्ञात रहस्य झोम्बी व्हायरस नंतरचे जग आणि रहस्ये सन : २०४९

Author Name: Vikrant Zore | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

झोंबी व्हायरसमुळे खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. सैन्य दलांनी सर्व झोंबींना मारून सर्व शहरांना झोंबी मुक्त घोषित केले. आता मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले आहे. परंतु या व्हायरसची सुरुवात कशी झाली हे कुणालाच शोधता आले नाही. तसेच यावर लस सुद्धा बनवता आली नाही.

आता झोंबी नाहीत, पण अजूनही काही रहस्य मय गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा अजूनही झाला नाही. या पुस्तकात काही धाडसी तरुण या सर्व रहस्यांचा कसा उलगडा करतात आणि काही अकल्पित संकटांचा कसा सामना करतात ते लिहिले आहे. त्यांना कल्पना सुद्धा नसते की त्यांचा सामना कुणासोबत होणार आहे.

या तरुणांचा प्रवास रोमांचक आहे. त्यांच्या साहसामध्ये भयानक रहस्ये, अज्ञात शत्रू आणि अनपेक्षित धोक्यांचा सामना आहे. त्यांचे धैर्य, बुद्धिमत्ता आणि एकता यांच्या जोरावर ते या संकटांना कसे सामोरे जातात, हे या पुस्तकात चित्त थरारक पद्धतीने मांडले आहे.

या अज्ञात संकटांचा हे तरुण सामना करू शकतील का? त्यांना या व्हायरस मागचं सत्य सापडेल का? त्यांच्या साहसात काय काय उघडकीस येईल? वाचकांना अखेरपर्यंत बांधून ठेवणारी ही कथा आहे.

Read More...
Paperback
Paperback 265

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

विक्रांत झोरे

विक्रांत झोरे हे एक उदयोन्मुख लेखक आहेत ज्यांना रहस्यमय कथा आणि अनपेक्षित वळणांचे धागे विणण्याची विशेष आवड आहे. काल्पनिक कथांमध्ये विशेष प्रावीण्य असलेले विक्रांत, वाचकांना त्यांच्या कथांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनात मानवी मनोवृत्तीच्या सखोल अन्वेषणासोबतच रोचक आणि गुंतागुंतीचे कथानक साकारले जाते. मग ते रहस्यमय थ्रिलर असो किंवा हृदयस्पर्शी साहस, विक्रांतचे लेखन नेहमीच वाचकांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देत पुढील आश्चर्याची वाट पाहायला भाग पाडते.

Read More...

Achievements

+1 more
View All