डॉ. वैभव गोरडे, दुबई मधे मूत्रशल्यविशारद म्हणून काम करतात. जेव्हा मित्रपरिवार आणि कुटुंब, त्यांच्या बडबड्या स्वभावाला कंटाळले, त्यांनी डॉक्टरांना पुस्तक लिहायची कल्पना दिली. त्यातून तयार झालेले हे ग्रीक पुरणातल्या कथांवर आधारित पहिले पुस्तक.
डॉक्टर ह्या पुस्तकाबद्दल म्हणतात,
“ग्रीक कथांचा रोजच्या आयुष्यावर इतका प्रभाव आहे की, मला जर लहानपणी ह्या कथा कोणी सांगितल्या असत्या तर माझा अभ्यास सुखकर झाला असता. क्रिकेटमधल्या गुजरात टायटन्स पासून ऍमेझॉन वरून मागवलेल्या नाईकी शूज पर्यंत, हेलियम वायू पासून ग्रहताऱ्यांच्या नावापर्यंत सगळीकडे ग्रीक पुराणाचा संदर्भ आहे. ही पुस्तके ज्ञानाची कवाडे उघडून शिक्षण मनोरंजक करायला मदत करतील असा माझा ठाम विश्वास आहे.”
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners